fbpx
Latest Government And Private Jobs

Resume Tips: असा असावा रेझ्युमे! नोकरी साठी येईल त्वरित कॉल!

Resume Tips: असा असावा रेझ्युमे! नोकरी साठी येईल त्वरित कॉल!

तुम्हीही फ्रेशर असाल किंवा अनुभवी, तुम्हाला पहिल्याच Interview मध्ये जॉब हवा असेल तर Resume बनवण्याच्या काही टिप्स JobDikhao तुमच्याशी शेअर करत आहे. या Resume Tips चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. (How to make resume for any job)
नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही सादर केलेला रेझ्युमे(बायोडेटा) याचे महत्त्व मोठे असते. नोकरीसाठी अर्ज करताना सादर करावे लागणारे स्वत:च्या कार्यानुभवाचे, शिक्षणाचे परिचयपत्र म्हणजेच रेझ्युमे किंवा ‘बायो-डेटा’. रेझ्युमेतून उमेद्वाराच व्यक्तिमत्त्व, त्याची आजवरची कामगिरी याबद्दल माहिती मिळते.
अलीकडे इंटरनेट वर सुद्धा अनेक free resume templete उपलब्ध आहेत त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यासाठी तुम्हाला त्या free resume templete Download कराव्या लागतील.

✔️ Professional Resume Templeteहे मुद्दे तुमच्या रेझ्युमे मध्ये आहेत का याची खात्री नक्कीच करा.

🔰 रेझ्युमेच्या सुरुवातीलाच स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क पत्ता, मोबाईल, ई-मेल याची खरी, अद्ययावत आणि पूर्ण माहिती मोठय़ा आणि ठळकपणे देणे गरजेचे आहे. कारण या माहितीच्या आधारेच नियुक्त करणारी संस्था/कंपनी तुमच्याशी संपर्क करू शकेल.

🔰 तुम्हाला भविष्यात कोणत्या क्षेत्रात, कोणत्या हुद्दयावरती काम करण्याची ईछया आहे हे नमूद केलेलं असावे जेणेकरून भविष्यात संस्था/कंपनी ला आपण कोणत्या कामासाठी उपयोगी पडू शकतो हे समजू शकेल.

🔰 कामाचा अनुभव- तुम्ही यापूर्वीच्या संस्था/कंपनीमध्ये केलेली कामे, हाताळलेल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यांचा ठळक उल्लेख केलेला असावा. तसेच ज्या कंपनी/ कार्यालयातील जागेसाठी अर्ज करीत आहात, त्यासाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रातील आपला कार्यानुभवाचा स्वतंत्रपणे उल्लेख करणे महत्त्वाचे आहे.
उदा. नोकरीच्या जाहिरातीत अकाउंटंट या पदासाठी जर ‘व्हॅॅट, विक्री कर, सेवा कर या क्षेत्रातील अनुभव आवश्यक’ ठरत असेल तर आपला त्या क्षेत्रांतील अनुभव ठळक अक्षरांत स्वतंत्रपणे लिहून लक्षात आणून देणे आवश्यक ठरते.

🔰 अनुभवाचा कालावधी- पूर्वी नोकरी केलेल्या कंपन्या/संस्थांचे नाव, कामाचा कालावधी तसेच नोकरी सोडण्याचे कारण (उत्तम संधीसाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी असे असावे.) या गोष्टींचा या मुद्दय़ांमध्ये समावेश असावा. काही कारणास्तव शिक्षण किंवा नोकरीच्या कालावधीत खंड पडला असेल तर त्या बाबतचे समर्थनीय उत्तर मनात तयार ठेवावे.

🔰 तुमचे शिक्षण- ज्या नोकरी साठी अर्ज करता ती नोकरी करण्यासाठी असणारे तुमच्याकडचे स्किल्स सोबतच काही विशेष अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर त्याचा उल्लेख रेझ्युमे मध्ये नक्की असावा.

🔰 कम्प्युटरच ज्ञान- आजकाल कम्प्युटर च ज्ञान असण गरजेचं मानलं जातं. तुम्हाला कम्प्युटर च ज्ञान तुमच्या रेझ्युमे मध्ये प्लस पॉइंट अॅड करण्यासाठी नक्कीच मदत करतं. त्यामुळे कमीत कमी बेसिक कम्प्युटर हाताळणी तुम्हाला यायला हवी.

🔰 तुमच्या आवडी, छंद याबाबत थोडक्यात माहिती- छंद जोपासण्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यातून तुमची वैचारिक, मानसिक, शारीरिक प्रगल्भता निवड करणाऱ्या व्यक्तीला जाणवू शकते,तुमची प्रतिमा सकारात्मक होण्यास मदत होते. (उदा. वाचन, स्वयंसेवी संस्थांमधील सामाजिक कार्य, जागतिक राजकारण, पर्यावरण संतुलन याविषयी अभ्यास, गिर्यारोहण, प्रवास अशा स्वरूपाचे छंद अभिप्रेत आहेत.

🔰 शिफारस पत्रे- शालेय, महाविद्यालयीन कालावधीत, शिक्षण किंवा शिक्षणेतर कारणांसाठी प्राप्त झालेली राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील प्रशस्तिपत्रके, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा आधीच्या नोकरीतील किंवा तेथील मुख्य व्यक्तीकडून (मुख्य कार्यकारी अधिकारी/ व्यवस्थापकीय संचालक) उत्तम कामगिरीसाठी प्राप्त केलेली कौतुकाची पत्रे अथवा संदर्भ पत्रे यांची नोंद रेझ्युमेत असणे आवश्यक आहे. परिणामकारक रेझ्युमेसाठी..

हे वाचा: परीक्षेत मार्क्स कमी आहेत का ? काळजी करू नका या क्षेत्रात भरघोस कमाई ची संधि..

🔰 Resume Templete मध्ये मजकूर सुस्पष्ट असावा- अक्षर वाचनीय असावे. योग्य ती माहिती रकाना स्वरूपात देणे आवश्यक आहे. हल्ली रेझ्युमे बहुतेकदा संगणकावरच बनवले जातात आणि ईमेलद्वारे इच्छित स्थळी पाठवले जाते. अन्यथा, उत्तम प्रतीच्या कागदावर, कोणतीही खाडाखोड न करता ठळक, सुवाच्य हस्ताक्षरांत रेझ्युमे लिहिले जाणे महत्त्वाचे आहे.

🔰 उत्तम रेझ्युमेची लांबी महत्त्वाची नसून त्यातील मजकुराची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. एखाद्या अननुभवी व्यक्तीच्या रेझ्युमेतील मजकूर कमी असू शकतो, तर एखाद्या उच्चशिक्षित, अनुभवी उमेदवाराकडे लिहिण्यासारखे खूप काही असू शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर नोकरीची संधी संपादन करण्यासाठी स्वत:बद्दलची सर्व आवश्यक माहिती समर्पक शब्दांत सादर करणे गरजेचे ठरते.

🔰 तुमच्याबद्दल नोकरी देणाऱ्या व्यक्तींना अधिक जाणून घ्यायचे असेल तर त्यांना संपर्क साधता यावा, म्हणून तुमचा चालू फोन क्रमांकही आणि ईमेल सुद्धा रेझ्युमेत समाविष्ट करणे आवश्यक आहे.

🔰 रेझ्युमे बनवताना इंटरनेटवरील नोकरीविषयक विविध वेबसाइट वर वेगवेगळ्या रेझ्युमे च्या टेंप्लेट्स उपलब्ध असतात त्याची तुम्ही मदत घेऊ शकता.

🔰रेझ्युमेतील लेखनावरून तुमच्या भाषाज्ञानाचा आणि लेखन कौशल्याचा अंदाज घेतला जातो, म्हणून तयार रेझ्युमे पुन:पुन्हा वाचून, बिनचूक असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.

✔️ तर, या होत्या रेझ्युमे(Resume) कसा असावा? याबादल टिप्स. रेझ्युमे सोबतच नोकरी मिळवण्यासाठी खूप काही गोष्टी गरजेच्या असतात त्यापैकि एक म्हणजे तुमचं ज्ञान. ज्या क्षेत्रात तुम्हाला नोकरी करायची आहे त्या क्षेत्रातल तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे.

आजकाल एका नोकरी साठी हजारो अर्ज येतात, आणू त्यापैकि जर तुम्हाला नोकरी मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर इतरांपेक्षा तुमचं संबंधित क्षेत्रातल ज्ञान अधिक आणि योग्य असावं.

You might also like