fbpx
Latest Government And Private Jobs

NVS Bharti 2024 | नवोदय विद्यालय समिती मध्ये 10 वी, 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! पगार – 1,42,400 रुपयांपर्यंत

NVS Bharti 2024

NVS Bharti 2024: नवोदय विद्यालय मध्ये भरती निघाली आहे, NVS Bharti साठी 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, LLB, B.Sc, B.Tech आणि ITI अशा पात्रतेवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जर तुम्ही यापैकी कोणतेही एक पात्रता निकष पूर्ण करत असाल, तर तुमच्या साठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

नवोदय भरती साठी एकूण रिक्त जागा या 1377 एवढ्या आहेत, ज्या 14 वेगवेगळ्या पदामध्ये विभागलेल्या आहेत. सर्वात जास्त रिक्त जागा या मेस हेल्पर आणि ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट या पदासाठी आहेत.

उमेदवारांना या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑफलाईन अर्ज सादर केला तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाही.

नवोदय भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी ही कायमस्वरूपी असणार नाही. नोकरीचा कालावधी हा कमी किंवा जास्त होऊ शकतो, याचे पूर्ण अधिकार नवोदय विद्यालय समिती कडे असणार आहेत.

निवड केलेल्या उमेदवाराला रिक्त जागेवर कायमस्वरूपी नियुक्त ठेवायचे की नाही, हे बऱ्या पैकी उमेदवारावर अवलंबून असणार आहे. जर उमेदवाराचा Performance चांगला असेल, तर उमेदवाराला नोकरी वर अधिक कालावधी साठी ठेवले जाणार आहे, आणि जर Performance खराब असेल तर कोणत्याही नोटीस शिवाय उमेदवाराला पदावरून बरखास्त केले जाणार आहे.

NVS Bharti 2024

NVS Bharti 2024

पदाचे नावपद संख्या
स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)05
ऑडिट असिस्टंट (Group-B)12
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)04
लीगल असिस्टंट (Group-B)01
स्टेनोग्राफर (Group-B)23
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)02
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)78
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)21
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)360
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)128
लॅब अटेंडंट (Group-C)161
मेस हेल्पर (Group-C)442
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19
एकूण जागा 1377 जागा

NVS Bharti Educational Qualification

  • पद क्र.1: (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: B.Com
  • पद क्र.4: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  • पद क्र.7: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
  • पद क्र.8: हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
  • पद क्र.9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.10: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: 10वी उत्तीर्ण

पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष देखील भिन्न आहेत, यामधे सर्वात जास्त रिक्त जागा या 10 वी आणि 12 वी व ITI, डिप्लोमा वर राबवल्या जाणार आहेत. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी कोणते निकष लावण्यात आले आहेत, त्याची माहिती जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

NVS Bharti Age Limit

वयाच्या अटी मध्ये देखील पदा नुसार निकष वेगवेगळे आहेत,
यामधे सर्व पदासाठी किमान वयाची अट ही 18 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे.

वयाच्या अटी मध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे, यामधे SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट आहे.

  • पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
  • पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
  • पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  • पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.11: 18 ते 40 वर्षे

NVS Bharti Application Form

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख24 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2024

Online Application Process

  • भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी उमेदवारास अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.
  • वेबसाईट वर जाण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Important Links Section मधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करून वेबसाईट ओपन करा.
  • वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक शोधा, आणि त्यावर क्लिक करून फॉर्म ओपन करा.
  • फॉर्म भरताना उमेदवारांना जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.
  • परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज मान्य केला जाणार नाही. फी ही सर्वांसाठी वेगवेगळी आहे, ओपन आणि ओबीसी गटाला पद 1 साठी 1500 रुपये भरायचे आहेत, तर पद 2 ते 14 साठी 1000 रुपये भरायचे आहेत. बाकी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 500 रुपये फी भरायची आहे.
  • फी भरून झाल्यावर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, एकदा अर्ज सबमिट केला की तो नवोदय विद्यालय समिती कडे सादर होईल, आणि तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

NVS Bharti Links

अधिकृत वेबसाइट भेट द्या
जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

NVS Bharti Selection Process

नवोदय विद्यालय समिती भरती साठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे. यामध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, त्यात 1/4 अशी Negative Marking System असणार आहे.

परीक्षेत पास झालेले उमेदवार मुलाखती साठी पात्र असणार आहेत, त्यांना Interview साठी बोलवले जाणार आहे, आणि लेखी परीक्षा व Interview या दोन्ही चे मार्क एकत्रित करून मेरिट लिस्ट काढली जाणार आहे, लिस्ट मध्ये जे उमेदवार येतील, त्यांची निवड रिक्त पदासाठी केली जाणार आहे.

NVS Bharti FAQ – NVS Bharti 2024

नवोदय विद्यालय समिती भरती साठी एकूण जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 1377 आहेत, ज्या 14 वेगवेगळ्या पदांसाठी असणार आहेत.

नवोदय विद्यालय समिती भरती साठी अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.

नवोदय विद्यालय समिती भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?

30 एप्रिल 2024 हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वाचा: NLC India Recruitment 2024: 10 वी/12 वी पास उमेदवारांना आनंदाची बातमी!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी|

वाचा: PCMC Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत भरती सुरु|

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा

ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like