fbpx
Latest Government And Private Jobs

आयटी क्षेत्रात यंदा 90000 नोकऱ्या; WFH सुरू राहणार की बंद? वाचा सविस्तर.

TCS आणि Infosys ने नवीन कर्मचारी भरतीसाठी FY21 मध्ये एकूण 61,000 कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले होते. FY22 मध्ये TCS ने 100,000 आणि Infosys ने 85,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली आहे.

IT (आयटी) उद्योगाला सध्या चांगले दिवस आले आहेत. तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचं नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर उपाय म्हणून कंपन्या भरती प्रक्रिया राबवत असतात. भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS लवकरच 40,000+ कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. त्याच बरोबर IT कंपनी Infosys यंदाच्या वर्षात 50,000 पेक्षा अधिक नोकरीच्या संधी देण्याच्या विचारात आहे.

फेब्रुवारी 2022 ते मार्च 2022 या तीन महिन्यात आयटी क्षेत्रात कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचं प्रमानाचा दर चक्क 27.7 टक्क्यांवर गेला. हा दर डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 25.5 टक्के एवढा होता.

TCS आणि Infosys ने नवीन कर्मचारी भरतीसाठी FY21 मध्ये एकूण 61,000 कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले होते. TCS आणि Infosys ने FY22 मध्ये अनुक्रमे 100,000 आणि 85,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली आहे.

Infosys च्या म्हणण्याप्रमाणे ते FY23 मध्ये 50,000 हून अधिक फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याच्या विचारात आहेत. “गेल्या वर्षात, Infosys ने संपूर्ण जगामध्ये 85,000 फ्रेशर्सना कामावर घेतलं आहे. या वर्षी Infosys 50,000 पेक्षा जास्त उमेदवारांना कामावर घेण्याच्या तयारीत आहे.

हे वाचा: Resume Tips- असा असावा Resume! नोकरी साठी त्वरित येईल कॉल.

याचबरोबर, भारतातील आघाडीची IT कंपनी TCS चालू वर्षात 40,000 उमेदवारांना भरती करणार आहे.

वर्क फ्रॉम होम सुरू राहणार की बंद?

वर्क फ्रॉम होम (WFH) आयटी क्षेत्रात चांगल्या प्रकारे चाललं आहे. यानंतर आता या क्षेत्रात हायब्रीड वर्क मॉडेल लागू करण्याची योजना तयार केली जात आहे.

TCS ने असंही म्हटलं आहे की, कंपनी पाथ-ब्रेकिंग 25X25 मॉडेल स्वीकारण्यासाठी वचनबद्ध आहे. या मॉडेलचा अर्थ आहे की, कंपनीच्या 25 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना केव्हाही ऑफिसमधून काम करणं आवश्यक नाही आणि त्यांना त्यांच्या वेळेतील 25 टक्क्यांहून अधिक वेळ ऑफिसमध्ये घालवण्याची गरज नाही.

सोबतच, Infosys आठवड्यातून 2 दिवस ऑफिस मध्ये काम करणे गरजेचे समजत आहे. मिळालेल्या माहिती नुसार Infosys खूप कालावधी साठी हायब्रिड मोडेल मधेच काम करणार आहे.

You might also like