fbpx
Latest Government And Private Jobs

फ्रीलान्सिंग करियर! फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय आणि फ्रीलान्सिंग करियर द्वारे तुम्ही पैसे कसे कमवू शकता वाचा सविस्तर.

फ्रीलान्सिंग बद्दल सोप्या भाषेत सांगायच झालं तर एक व्यक्ति जो त्याच्या कडील असणार्‍या स्किल च्या आधारे सर्व्हिस ऑफर करतो आणि प्रती तास किंवा कामानुसार फी आकारतो. बर्‍याचदा फ्रीलान्सर कडे स्वताचे ऑफिस नसते, हे व्यक्ति वेळेनुसार कुठूनही काम करू शकतात.अलीकडे हा ट्रेंड वाढताना दिसतोय.

फ्रीलान्सिंग तुमच्यासाठी आहे काय?

पहा, जरा तुम्हाला ऑफिस मध्ये न जाता, कोणत्याही वेळेत घरून किंवा कोणत्याही ठिकाणावरून काम करण्यास खूप आवड असेल, बॉस च कामासाठी टेंशन नको असेल आणि तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातील परफेक्ट स्किल असेल ज्याच्या मदतीने तुम्ही एखादी सर्व्हिस ऑफर करू शकता जीच्या मदतीने पैसे कमावले जाऊ शकतात तर नक्कीच फ्रीलान्सिंग करणे हे तुमच्यासाठी चांगले करियर ठरू शकते.

त्यासोबतच, तुमच्याकडे क्लाईंट शोधणं, क्लाईंट ला तुम्ही ऑफर केलेली सर्व्हिस इतरांपेक्षा तुम्ही कश्या प्रकारे चांगल्या प्रकारे देवू शकता हे पटवून देण्याचं कौशल्य असायला पाहिजे.

तसेच इंटरनेटच बर्‍यापैकी ज्ञान असावं ज्याची मदत तुम्हाला क्लाईंट शोधण्यासाठी होईल. अनेक websites आहेत ज्या तुम्हाला तुमच्या स्किल प्रमाणे clients शोधण्यासाठी मदत करतात. मिळेल्या क्लाईंट सोबत डील करून तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता. तर त्या वेबसाइट कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत.

हे वाचा: Apple कंपनी भारतातील एम्प्लॉईजना चक्क देते एवढा पगार ? वार्षिक पॅकेज पाहून डोळे चक्रावतील !

भारतातील आणि परदेशातील फ्रीलान्सिंग वेबसाइट्स

  • Fiverr. Fiverr is a freelance service marketplace designed to help individuals get started with freelance work
  • Upwork
  • Freelancer.com
  • Envato Studio
  • Brybe
  • CrewScale
  • PeoplePerHour
  • Toptal

या वेबसाइट वर जाऊन तुम्ही रजिस्टर करा, तुमच्या स्किल बद्दल माहिती भरा, तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वरती काम केल असेल तर ते डिटेल्स भरा आणि तुमच्या सेर्व्हिसेस ऑफर करा.

तर, ही होती फ्रीलान्सिंग करियर बद्दल थोडी माहिती. फ्रीलान्सिंग साठी ग्राहक कसे मिळवायचे याबद्दल लवकरच डिटेल्स मध्ये नवीन आर्टिकल येणार आहे. तोपर्यंत jobdikhao.com सोबत कनेक्ट रहा.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like