fbpx
Latest Government And Private Jobs

अबब!! Burger-Sandwitch खाण्यासाठी महिन्याला 95 हजार पगार! असा करा अर्ज.

फास्ट फूड खायला कोणाला नाही आवडत.  बर्गर-सँडवीच तुमचं नक्कीच फेवरेट असणार नाही का? पण जर का तुम्हाला फक्त बर्गर-सँडवीच टेस्ट करायला पैसे देत असेल तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. चला तर जाणून घेऊ कुठे आहे ही सुवर्ण संधी.

फक्त बर्गर-सॅंडवीच खाण्यासाठी कोणी पैसे देता का? असा सुद्धा जॉब असू शकतो का? असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. पण हो, असा जॉब असतो ज्यामधे तुम्हाला फूड टेस्ट करून पहावे लागतात, त्याची चव, सुगंध याबद्दलची माहिती/रीपोर्ट कंपनी ला देणे आवश्यक असते. या नोकरी ला फूड टेस्टर जॉब (food tester job) म्हणतात.

कोण देत आहे ही नोकरी?

तर, MaterialsMarket.com या वेबसाइट कडून ही नोकरी ऑफर केलेली आहे.  Takeaway Testers या पदासाठी ही नोकरी असणार आहे. यामध्ये तुम्हाला मॅकडोनाल्ड्स (McDonald’s), सबवे (Subway), ग्रेग्स (Greggs) असे प्रसिद्ध मील पॅक्स असतील जे टेस्ट करावे लागतील आणि त्याची नोंद ठेवावी लागेल.

येथे करा अर्ज.

या नोकरी ला अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://materialsmarket.com/careers/ या वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सगळी माहिती काळजीपूर्वक अर्जासाठी दिलेला फार्म भरून अर्ज करू शकता.

You might also like