fbpx
Latest Government And Private Jobs

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ स्कीमला का होतोय देशभरात विरोध? तरुणांचं म्हणणं तरी काय? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

तरुणांच्या अपेक्षा तरी काय आहेत? केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ स्कीमला का होतोय देशभरात विरोध?(why students protesting against Agneepath scheme?) इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर..

काय आहे अग्निपथ योजना? अग्निपथ योजना क्या है?

अग्निपथ योजनेंतर्गत वर्षभरात 96 हजार सैनिकांची भरती (what is Agnipath scheme?) करण्यात येणार आहे. यातील 40 हजार भरती लष्करासाठी आणि उर्वरित भरती हवाई दल आणि नौदलासाठी केली जाणार आहे. यातील पहिली भरती पुढील 90 दिवसांत होणे अपेक्षित आहे.

देशभरातील तरुण तिन्ही सैन्यात भरती सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे या स्कीम देशभरातून तरुणांचा विरोधी (students protesting against Agnipath scheme) होताना दिसून येतोय. मात्र हा नेमका विरोध कशासाठी? (why students protesting against Agnipath scheme?) देशभरातील सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवाराचं म्हणणं नेमकं आहे तरी काय? का देशभरात जाळपोळ करण्यात येतेय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

हे वाचा: मोबाइल वर टायपिंग करून 30,000 रु. कमवा ! Work From Jobs

देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये लष्करी स्तरावर भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर देशभरात त्याचा विरोध सुरू आहे. कुठे रस्ते अडवले जात आहेत तर कुठे रेल्वे जाळली जात आहे. आंदोलनानंतर दबावाखाली आलेल्या केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचा काहीही उपयोह होताना दिसून येत नाहीये. अजूनही देशाच्या तब्बल अकरा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

सैन्यभरती थांबवल्याणे विद्द्यार्थी संतप्त

अनेक तरुणांचे म्हणणे आहे की, नोकरीसाठी त्यांचे वय ओलांडत आहे आणि सैन्यात भरती थांबवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सेवांमधील भरती थांबवण्यात आली होती. त्यामुळे तयारी करताना अनेक तरुणांचं वय जास्त झालं आहे. म्हणूनच आता या योजनेअंतर्गत त्यांना सैन्यभरती मिळणार नाही. इतके वर्ष सैन्यात भरतीची स्वप्न बघणाऱ्या तरुणांना सैन्यभरती थांबवल्याचा संताप आला आहे.

चार वर्षांच्या सेवेनंतर पुढे काय?

हे वाचा: परीक्षेत मार्क्स कमी आहेत का ? काळजी करू नका या क्षेत्रात भरघोस कमाई ची संधि..

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार चार वर्षांनीच सेवानिवृत्ती दिली जाईल. त्यामुळे निवृत्त मुलं पुढे काय करणार? 18 ते 22 वयोगटातील 75% मुले 22-26 वयोगटात असताना सेवा संपल्यामुळे बेरोजगार असतील असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या योजनेमुळे बेरोजगारी वाढण्याचा धोका अधिक आहे असंही काही तरुण म्हणताहेत.

त्या’ तरुणांचं काय?

चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी केडरमध्ये भरती केले जाईल, असा सरकारचा युक्तिवाद आहे. पण दहावी-बारावी उत्तीर्ण होऊन अग्निवीर झालेल्या 75% तरुणांचे काय? त्यांना दुसरी नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे काही योजना आहे का? असाही सवाल आंदोलनकर्त्या तरुणांकडून विचारण्यात येतोय.

अवघ्या सहा महिन्यात प्रशिक्षण?

सैन्यात एक चांगला सैनिक तयार होण्यासाठी 7-8 वर्षे लागतात, अशा परिस्थितीत अग्निवीर अवघ्या 6 महिन्यांत कसा ट्रेंड करू शकेल. यासोबतच अग्निवीर जवानांना त्यांच्या कुटुंबाची काळजी नेहमीच सतावत असते. 3-4 वर्षे पूर्ण करून तो कसा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे इतक्या कमी वयात आणि कमी कालावधीत प्रशिक्षण आणि नोकरी अशक्य होईल असंही काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर अजून काय निर्णय घेतं हे बघणं महत्वाचं असेल.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like