© 2022 - JobDikhao.
Pune Karagruh Vibhag Bharti 2024: 12वी पास उमेदवारांसाठी पुणे कारागृह विभागात शिपाई पदाची भरती; 513 जागा!!
Pune Karagruh Vibhag Bharti 2024
Pune Karagruh Vibhag Bharti 2024: पुणे कारागृह विभाग अंतर्गत नोकरीची खास संधी आहे. कारागृह शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. 12वी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Pune Karagruh Vibhag Bharti 2024 या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. Pune Karagruh Vibhag Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, पद संख्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pune Karagruh Vibhag Bharti 2024
पदाचे नाव | कारागृह शिपाई Pune Karagruh Vibhag Bharti 2024 |
पद संख्या | 513 जागा |
शैक्षणिक पात्रता | बारावी पास उमेदवार |
अर्ज शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी – Rs.450 शुल्क मागास व राखीव प्रवर्गासाठी – Rs.350 शुल्क |
वयोमार्यादा | उमेदवारचे वय 18 ते 28 वर्ष. मागासवर्गीय व राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 23 वर्ष वयोगटातील उमेदवार |
नोकरी ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 5 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | http://mahaprisons.gov.in/ |
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- ओळखीचा पुरावा
- 1२ वी पास निकाल
- जातीचा दाखला ( राखीव प्रवर्गात असल्यास)
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल
- कास्ट व्हॅलेडीटी
लक्षात घ्या –
या भरतीचा अर्ज कारागृह विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
वेबसाईट ओपन होत नसेल तर मोबाईल वर स्क्रीन रोटेट करून “शो डेस्कटॉप साईट ” वर क्लिक करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, ते अर्ज बाद केले जातील.
अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहिती वरती दिली आहे. ती माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असायला हवे याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
अर्ज करताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्या कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.
अर्ज सबमिट करताना सर्व माहिती तपासून पहा. एकदा सबमीट केलेला अर्ज परत एडिट करता येणार नाही.
अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमीट होणार नाही त्यामुळे उमेदवारांनी योग्य पद्धतीने अर्ज शुल्क भरून मगच अर्ज सबमीट करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे आणि तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.