© 2022 - JobDikhao.
MSCE Bharti 2024: पुणे येथे “मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक” या रिक्त पदांची भरती जाहिर!! पगार – 30,000 रूपये |
MSCE Bharti 2024
MSCE Bharti 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी विविध रिक्त पदांवर भरती जाहीर केली आहे. मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे याचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्तालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
MSCE Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख8 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSCE Bharti 2024
भरती विभाग | शिक्षण आयुक्तालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. |
पदाचे नाव | मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक व इतर पदे. MSCE Bharti 2024 |
पद संख्या | 023 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार. |
व्यावसायिक पात्रता | मुख्य लिपिक – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] टंकलेखन/ संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3] मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक. वरिष्ठ लिपिक – 1] वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक/ लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव. 2] एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे निम्नश्रेणी लघुलेखक – 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2] टंकलेखन/ संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3] एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. |
नोकरी ठिकाण | पुणे |
पगार | 30,000 रूपये. |
वयोमार्यादा | 18 ते 43 वर्ष |
अर्ज शुल्क | खुल्या प्रवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/- मागासवर्गीय/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार : रु. ८५०/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 8 एप्रिल 2024 |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.