fbpx
Latest Government And Private Jobs

सरकारच्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर बेरोजगारांनी नोंदणी कशी करावी ? तर चला पाहूया. mahajobs registration

राज्यातील बेरोजगार तरुणांना कलेच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि औद्द्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना पाहिजे असलेल्या कुशल/ अकुशल कामगाराचा शोध घेणे सोपे व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘महाजॉब्स’ हे नवीन पोर्टल/वेबसाइट सुरू केले आहे. mahajobs registration /Jobseeker Registration.कसे करावे पहा सविस्तर.

कंपन्यांना पाहिजे असलेल्या नोंदणीकृत कामगारांची माहिती वेबसाइटवर सहज उपलब्ध होत असल्याने बेरोजगार आणि रोजगार देणार्‍या मधील अंतर कमी झाल्याने वेबसाइटच्या माध्यमातून कामगारांना अचूकपणे रोजगार किंवा नोकरी मिळू शकते, ही अपेक्षा आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यात (कारखाना) काम किंवा नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगारांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन नाव आणि नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.

1.सर्वात प्रथम ‘महाजॉब्स’ नोंदणीसाठी https://mahajobs.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जायचं आहे.

2. अगोदर तुमचं नाव टाइप करा.

3. तुमचा मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी मिळवा,आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा. तसेच ईमेल आयडी टाकून ओटीपी मिळवा आणि ई-मेल वर ओटीपी पडताळणी  करून पहा.  

महत्वाचं:- ईमेल आयडी पर्यायी आहे पण आपण टाकलेल्या ईमेलची पडताळणी अनिवार्य आहे. ईमेल आयडी वेबसाइटवर संवादासाठी वापरली जाऊ शकते, याची कृपया सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

4. आपल्याला हवा तसा आपल्या मनाप्रमाणे आपल्या आवडीचा पासवर्ड टाकून परत एकदा पासवर्डची पडताळणी करा.

5. त्याचबरोबर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करून सबमिट करा.

हे वाचा: Apple कंपनी भारतातील एम्प्लॉईजना चक्क देते एवढा पगार ? वार्षिक पॅकेज पाहून डोळे चक्रावतील !

पासवर्ड:- (Password) प्रथम आपला पासवर्ड हा कॉम्प्लेक्स असला पाहिजे हे लक्षात ठेवून त्यात किमान 8 कॅरेक्टर्स असले पाहिजे तसेच पासवर्डमध्ये किमान 1 कॅपिटल अक्षर+1 लोअरकेस अक्षर , 1 नंबर आणि 1 स्पेशक कॅरेक्टर्स (जसे की $, @, #) असणे आवश्यक असून आपल्या पासवर्डची नोंद करून ठेवा.

6. युजरनेम आणि पासवर्डने लॉगिन करून तुमची शैक्षणिक संबंधित सगळी माहिती भरणे आवश्यक आहे.

7. तसेच शैक्षणिक माहिती सोबतचं तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल, असल्यास तुमच्या कलेविषयी माहिती भरू शकता.

8. तुम्ही सर्व माहिती भरून नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल, आणि मेसेज आल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल…


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like