© 2022 - JobDikhao.
मुंबई महानगरपालिकेत एकूण 690 पदांची भरती | Mumbai Mahanagarpalika Bharti 2024| पगार- 41,800 ते 1,32,300 रूपये.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची खास संधी; कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 690 नवीन रिक्त पदे भरण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरीची चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका, नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
पदाचे नाव | कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनि,ष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) , दुय्यम अभियंता (स्थापत्य) , दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) |
पद संख्या | 690 जागा |
शैक्षणिक पात्रता | या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.) |
व्यावसायिक पात्रता | कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) : सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील अभियांत्रिकी डिप्लोमा. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) : इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रिकल/ उत्पादन अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा. दुय्यम अभियंता (स्थापत्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी. दुय्यम अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) : मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदवी/ इलेक्ट्रॉनिक्स/उत्पादन अभियांत्रिकीमधील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इंजिनिअरिंग) पदवी. |
वयोमार्यादा | 18 ते 43 वर्ष वय असलेले उमेदवार |
भरती कालावधी | कायमस्वरुपी (permanent) नोकरी मिळवा. |
पगार | 41,800 ते 1,32,300 रूपये. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 डिसेंबर 2024 |
महत्वाची सूचना:
- या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील.
- ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या सामाईक गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती / अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
- या भरतीसाठी वयोमर्यादा ही अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे असणार आहे.
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.