fbpx
Latest Government And Private Jobs

MSF BHARTI 2024: MSF मध्ये 10,000 सुरक्षारक्षकांची भरती जाहीर!

MSF BHARTI 2024: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये 10,000 सुरक्षारक्षक यांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या मध्ये पात्र असलेल्या 10,000 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

MSF BHARTI 2024 या भरती संदर्भातील अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

पात्र असेल्या उमेदवारांची दिनांक निहाय यादी खाली देण्यात आली आहे. या यादीतील पात्र उमेदवारांनी दिनांक निहाय यादी प्रमाणे सकाळी १०.०० वा. महामंडळाचे निकष पडताळणीसाठी गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ, मुंबई येथे हजर रहावे. (दुपारी ०३.०० वा. नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.) निकष पडताळणीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर रहावे लागेल, निकष पडताळणी केंद्रावरती उमेदवारांसाठी कोणतीही व्यवस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून केली जाणार नाही.

भरतीची pdf जाहिरात, पात्र उमेदवारांची यादी व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

इतर नियम व अटी :

1. उमेदवारास दिलेल्या दिर्नाकास अपवादात्मक परिस्थितीत (इतर तातडीचे काम) निकष पडताळणीस हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिध्द केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात. परंतु दिनांक २०/१२/२०२४ रोजी शेवटचा दिवस असून त्या दिवशीही गैरहजर राहील्यास त्यानंतर त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. व निकष पडताळणी २०२४ करीता विचार केला जाणार नाही.

2. उमेदवारांनी निवासाची व्यवस्था स्वतः करावी, निकष पडताळणीसाठी दिलेल्या दिनांक व वेळेस हजर रहावे. त्यापुर्वी कोणीही भरतीसाठी दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी येऊ नये. सदर ठिकाणी वेळेच्या आधी आल्यास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ज्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश प्राप्त झालेला आहे. किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत ज्यांचे नावे आहे, त्यांनीच सदर ठिकाणी हजर राहवे व इतरांना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3. उमेदवारांनी १०/१२ वी पास गुणपत्रिका व प्रमाणपत्र, / जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडण्याचा दाखला / आधार कार्ड पैन कार्ड अधिवास प्रमाणपत्र वाहन चालवण्याचा परवाना (असल्यास) / मुळ प्रती सोबत आणावेत. तसेच सोबत पोलीस भरती मध्ये मैदानी व लेखी परिक्षेस हजर राहील्याबाबतची (प्रवेश पत्र) कागदपत्राच्या मुळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

4. जे उमेदवार यापुर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत / किंवा कार्यरत होते. व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे. किंवा करार खंडीत करण्यात आला आहे. किंवा या पुर्वी प्रशिक्षणास पाठवण्यात आले होते. परंतु राजीनामा, गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतिक्षाधीन यादीवर आहेत. असे उमेदवार सन- २०२१ च्या पोलीस भरतीस हजर राहलेले आहेत. त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला किंवा वेबसाईटवर प्रसिध्द यादीत त्यांचे नावे असले तरी, त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहु नये, हजर राहील्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. तसेच दिशा भुल करुन महामंडळात पुन्हा नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

5. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला https://mssc.co.in/application/index.php ही लिंक ओपन करुन तेथे दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थीत भरणे आवश्यक आहे. तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर (Privacy Policy) यावर क्लिक करुन तेथील दिलेल्या सुचना प्रमाणे फॉर्म काळजीपुर्वक भरण्यात यावा. तसेच फॉर्म मध्ये दिलेल्या जागी स्वतः चे अलीकडील काळातील रंगीत छायाचीत्र व सही अपलोड करावी, तसेच मुद्दा क्र. ७ मध्ये नमुद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी. संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमीट करण्यात यावा. तसेच नोंदणीच्या दिवशी येतांना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी. तसेच सर्व संबंधीत मुळ कागदपत्रे सोबत आणावी.

महत्वाच्या लिंक्स:

उमेदवारांनाची यादीयेथे क्लिक करा
उमेदवारांनासाठी सूचनायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like