© 2022 - JobDikhao.
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस विभागांत नोकरीची मोठी संधी!! पगार- 25,000 ते 35,000 रूपये|
Maharashtra Police Bharti 2025: पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर यांचे आस्थापनेवर रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकर आपले अर्ज सादर करावेत. पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. या भरतीची जाहिरात पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
Maharashtra Police Bharti 2025: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Police Bharti 2025
पदाचे नाव | गट-अ (०१) पद व विधी अधिकारी गट-ब (०१) पद व विधी अधिकारी यांचे ०२ पदे. |
पद संख्या | 04 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
वयोमार्यादा | 60 वर्षा पर्यंत. |
पगार | 25,000 ते 35,000 रूपये |
नोकरी ठिकाण | पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जानेवारी 2025 |
cp.aurangabad@mahapolice.gov.in |
इतर आवश्यक पात्रता :
विधी अधिकारी गट-अ :
१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा.
२) विधी अधिकारी गट- अ या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
विधी अधिकारी गट-ब :
१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा. तो सनद धारक असावा.
२) विधी अधिकारी गट-ब या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी, व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक असेल.
विधी अधिकारी :
१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तो सनद धारक असावा.
२) विधी अधिकारी या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी, व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
महत्वाच्या बाबी:
- उमेदवारांनी ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढुन प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस मुळ कागदपत्रासह हजर रहावे.
- सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवाराला शासकीय अधिकारी/कर्मचारी/म्हणून गणले जाणार नाही.
- सदर नेमणुका या करार नियुक्ती पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यासाठी करण्यात येतील, ११ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा, ११ महिन्याकरिता) वाढविता येईल. ३ वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अशा उमेदवारांना पुनःश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे सक्षम प्राधिका-यांचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
- उमेदवाराची निवड लेखी परीक्षेनंतर मुलाखतीद्वारे करण्यात येईल. मुलाखत पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.