© 2022 - JobDikhao.
महेंद्रसिंघ धोनी ठरला IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार; MS Dhoni :
MS Dhoni: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणारा दिग्गज खेळाडू म्हणजे महेंद्रसिंघ धोनी हा IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार ठरला आहे. आयपीएल 2008 मध्ये सुरु झाला. 20 फेब्रुवारीला पहिल्या IPL लिलावाला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्ट्रार स्पोर्ट्सने आयपीएलमधील ऑल टाइम्स बेस्ट संघ निवडला. माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सुमारे ७० पत्रकारांच्या मदतीने आयपीएलमधील सर्वोकृष्ट टीम बनवली आहे. तसेच या संघाचे नेतृत्व धोनीकडे सोपवण्यात आले आहे. महेंद्रसिंघ धोनीने ( MS Dhoni) आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर चेन्नईला आजवर एकूण ५ आयपीएल चषक जिंकून दिले आहेत.
वसीम अक्रम, मॅथ्यू हेडन, टॉम मूडी आणि डेल स्टेन यासारख्या दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या समितीने आयपीएलचा सर्वोत्तम संघ निवडला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली यांची सलामीवीराच्या रुपाने या टीममध्ये निवड करण्यात आली. तर तिसर्या क्रमांकावर आक्रमक डावखुला फलंदाज म्हणून ख्रिस गेलची निवड करण्यात आली आहे. मधल्या क्रमांकामध्ये सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव आणि एम एस धोनी यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूं म्हणून हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि कायरना पोलार्ड यांना संघात स्थान देण्यात आले. तर राशीद खान, सुनील नरेन आणि युझवेंद्र चहल या फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे, तसेच लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह हे दोन वेगवान गोलंदाज सर्वोकृष्ट संघाचा भाग ठरले आहेत.
कर्णधार म्हणून धोनीच – MS Dhoni
IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघाच्या कर्णधारपदी एकमताने महेंद्रसिग धोनीची निवड करण्यात आली आहे. यावेळी टॉम मूडी यांनी धोनीच्या नेतृत्व गुणाबाबत भाष्य केलं. आणि बोलले रोहित शर्माही अतिशय चांगला कर्णधार आहे. परंतु मुंबई इंडियन्सकडे अतिशय चांगले खेळाडू आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर डेल स्टेन म्हणाला कि धोनीकडे नैसर्गिक नेतृत्व गुण आहेत आणि त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर सर्व गोष्टी उत्कृष्टपणे हाताळल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेड यांनीही नेतृत्व गुणाबाबत भाष्य केलं.
IPL चा सर्वोत्तम संघ –
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, किरॉन पोलार्ड, रशीद खान, सुनील नरेन, युझवेंद्र चहल, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह.